एलॉन मस्कची मोठी घोषणा ; विकिपीडियाला टक्कर देणार’ हे ‘नव सॉफ्टवेअर


पुणे : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तसेच टेस्ला, स्पेसएक्स आणि एक्स या कंपन्यांचे मालक असलेले एलॉन मस्क यांनी मोठी घोषणा केली आहे.आता विकिपीडियाला टक्कर देण्यासाठी त्यांनी ‘ग्रोकीपीडिया’ नावाचा एआय आधारित सॉफ्टवेअर सुरू केला आहे. हा प्रकल्प विकिपीडियाला एक पर्याय म्हणून सादर केला असून तो पूर्णपणे एआय चॅटबॉट्सद्वारे चालवला जाणार आहे.

विकिपीडियाच्या तुलनेत ग्रोकीपीडियामध्ये पब्लिक एडिटिंग लिमिटेड ठेवण्यात आले आहे. या नव्या प्लॅटफॉर्मचे लक्ष मस्कच्या एआय नॉलेज सिस्टमवर असेल. मस्क यांनी असा दावा केला आहे की,ग्रोकीपीडिया विकिपीडियाच्या सध्याच्या स्थितीपेक्षा अधिक स्थिर आणि त्यांच्या स्वतःच्या विचारसरणीशी सुसंगत असेल.मस्क यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत ही घोषणा केली, “Grokipedia.com” चा प्रारंभिक वर्जन 0.1 आता लाईव्ह आहे. तर वर्जन 1.0 विकिपीडियापेक्षा दहापट चांगली असेल. या घोषणेनंतर काही वेळातच लाखो लोकांनी ग्रोकीपीडियाला भेट दिली. त्यामुळे काही क्षणांसाठी वेबसाइटची URL क्रॅश झाली. लाँचच्या वेळी या प्लॅटफॉर्मवर सुमारे ८००,००० एआय-निर्मित एंट्री उपलब्ध होत्या. तर विकिपीडियावर जवळपास ७ दशलक्ष मानवी एंट्री होत्या.एलोन मस्क यांनी शेअर केलेल्या पोस्टवर यूजर्सनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहींनी ग्रोकीपीडियातील चुकीच्या माहितीवर टीका केली, तर काहींनी या नव्या प्रकल्पाचे कौतुक केले आहे.

ग्रोकीपीडियाच्या वेबसाइटचा बैकग्राऊंड गडद रंगात आहे आणि सर्च बारसुद्धा त्याच टोनमध्ये सेट केलेला आहे. फॉन्ट शैली ChatGPT प्रमाणे दिसते. लँडिंग पेजवर दिसणाऱ्या आकडेवारीनुसार लाँचच्या पहिल्या दिवशी ८८५,२७९ आर्टिकल पाहिले गेले, तर त्याच दिवशी विकिपीडियावर ७,०८१,७०५ आर्टिकल पाहिले गेले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!