दुष्काळात तेरावा! एप्रिलपासून वीज दरात 37 टक्के वाढ होणार…!

मुंबई : सध्या संपूर्ण देशात महागाईचा भडका उडाला आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा फटका बसत आहे. असे असताना आता महावितरणने १ एप्रिलपासून वीज दरांमध्ये ३७ टक्क्यांची मोठी वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
यामुळे आता महागाईची झळ अजूनच तीव्र होणार आहे. कंपनीला सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणात अदानी पावर आणि जीएमआर, वरोरा यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.
न्यायालयाने महावितरणला हजारो कोटींचा दंड भरण्याचे निर्देश दिले आहेत. कंपनी वीज दरात आणखी वाढ करून या दंडाची भरपाई ग्राहकांकडूनच करील. त्यामुळे या उन्हाळ्यात वीज दरात आणखी वाढ होईल.
दरम्यान, सध्या उन्हाळा असल्याने विजेच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे. घरगुती तसेच शेतीसाठी देखील वीजेची मागणी वाढली आहे. असे असताना जर ही दरवाढ झालीच तर याच मोठा फटका सर्वसामान्य लोकांना बसणार आहे.
Views:
[jp_post_view]