पूर्व हवेलीत वीजेची आवस्था ‘आगीत उठून फुफाट्यात पडण्यासारखी’ ! थेऊर उपकेंद्रावर महावितरणचे अघोषित भारनियमन !!
उरुळी कांचन: महावितरणने लोणीकंद वीज केंद्रावर निर्माण होणाऱ्या वीजेच्या प्रचंड दाबामुळे थेऊर उपकेंद्राकडे येणाऱ्या १३२ के.व्ही उपकेंद्रावरील वाहिनीचा प्रवाह सलग दोन दिवस फोर्स आणि डिसफ्रेक्च लोडशेंडीग पध्दतीने अघोषितपणे चालू केल्याने पूर्व हवेलीत कडक उन्हाळ्यात अभूतपूर्व विजेची तीव्र समस्या निर्माण झाली असून महावितरणच्या या निर्णयाने शेतकरी, व्यावसायिक व घरघुती वीज ग्राहकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे.
खेड शिवापुर टोल नाक्यावर सापडले ५ कोटींचे ड्रग; ४ जणांना अटक, पुणे पोलसांची मोठी कारवाई
महावितरणने लोणीकंद वीजकेंद्रावर (४२० के.व्ही) निर्माण होत असलेल्या वीजेच्या प्रचंड दाबाने अघोषितपणेथेऊर उपकेंद्राकडे येणाऱ्या १३२ के.व्ही. वाहिनीवर फोर्स व डिसफ्रेक्च पध्दतीने लोडशेंडीग सुरू करण्याचा निर्णय दोन दिवसांपासून घेतला आहे. या निर्णायाचा परिणाम म्हणून थेऊर उपकेंद्रावर अवलंबून पेरणे व वळती केंद्रावरील असलेल्या ३० हून अधिक गावांना कडक उन्हाळ्यात भारनियमनाचा मोठा फटका बसला आहे.
या उपकेंद्रातून वळती, कोरेगावमूळ व यवत केंद्रावरील वीज बंद झाल्याने शेतकरी, व्यावसायिक व घरघुती वीज ग्राहकांना मोठा फटका बसत असून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना या अघोषित भारनियमनामुळे धोका पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पूर्व हवेलीच्या या पट्यात भारनियमनाच्या परिणामाने शेतकऱ्यांच्या ऊस , तरकारी, नर्सरी व्यावसायाला तीव्र फटका बसू लागला आहे. तालुक्यात तापमानाचा पारा गेली दोन दिवसांत ४०अंशसेल्सिअस पेक्षा वर राहिल्याने नागरीकांना या भारनियमनाचा तीव्र फटका बसू लागला आहे. या भागात वीजेचा पुरवठा सुरळीत असताना तांत्रिक बिघाडांनी वीजेची आवस्था दोलायमान असताना महावितरणे या समस्यांत भर घालून गेली दोन दिवस भारनियमन चालू केल्याने नागरीकांना मनस्ताप होऊ लागला आहे.
वळती व पेरणे उपकेंद्रावर भारनियमन का ?
लोणीकंद वीज केंद्रावर वीजेचा दाब वाढला असला ,तरी थेऊर उपकेंद्रावर खराडी हे उपकेंद्र आहे. मात्र लोडशेंडीग हे वळती ,पेरणे व यवत भागालाच का असा प्रश्न पडला आहे.