प्रचारतोफा अंतिम टप्प्यात असताना 20 जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये निवडणुका पुढे ढकलल्या ; प्रभाग कर्त्याचा हिरमोड..पुणे, धाराशिव, सोलापूर, चंद्रपूरचा समावेश


मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले असून 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतांच्या निवडणुका संपन्न होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना आता 20 जिल्ह्यातील काही नगरपालिकांच्या प्रभागात निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. त्यामध्ये, पुणे, सोलापूर, चंद्रपूर, यवतमाळ, अहिल्यानगर, धाराशिव, नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे

पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील 12 जागांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. तळेगाव आणि लोणावळ्यातील प्रत्येकी 6 जागांचा यामध्ये समावेश आहे. आमदार सुनील शेळकेंच्या बंधूच्या जागेची देखील निवडणूक पुढं ढकलली. पुण्यातील मावळ तालुक्यात दोन नगरपरिषदांमधील 12 जागांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्यात. त्यात तळेगाव आणि लोणावळ्यातील प्रत्येकी सहा जागांचा समावेश आहे. अजित पवारांचे आमदार सुनील शेळकेंचे बंधू सुदाम शेळके उभे असलेल्या प्रभाग क्रमांक 8 ब ची ही निवडणूक पुढं ढकलण्यात आली आहे. त्यामुळे, आता या 12 जागांवर 29 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडेल. न्यायालयात अपील झाल्यानं निवडणूक आयोगाने हा नवा कार्यक्रम जाहीर केला आहे. लोणावळा प्रभाग 10 अ आणि प्रभाग 5 ब पुढे ढकलण्यात आली आहे. तर तळेगाव दाभाडे नगरपरिषद मधील प्रभाग क्रमांक 2 अ, 7अ, 7ब, 8 अ, 8ब, 10ब पुढे ढकलण्यात आली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ नगरपरिषदेचीही निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. येथील दिग्रस पांढरकवडा आणि वणी येथील काही प्रभागांची निवडणूक लांबणीवर जाण्याची चिन्हे आहेत. ज्या ठिकाणी तांत्रिक चुका झाल्या तेथे निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगानं नव्याने कार्यक्रम दिला असून आता निवडणुक 20 डिसेंबरला होणार आहेत.

       

अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. कोपरगाव, देवळाली, नेवासा आणि पाथर्डी या चार ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दल कोर्टात अपील असल्याने नगरपरिषद निवडणूक पुढे ढकलली आहे. त्याबरोबरच सात नगरसेवक पदाच्या उमेदवाराबाबत कोर्टात अपील असल्याने त्या ठिकाणी देखील मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. पुढे ढकललेल्या नगरपरिषद आणि नगरसेवक पदाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये 10 डिसेंबरपर्यंत माघार घेण्यासाठी मुदत, तर 20 डिसेंबर मतदान आणि 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती आहेत.

धाराशिव न्यायालयीन अपील दाखल झाल्यामुळे स्थगित झालेल्या धाराशिव नगरपालिकेतील तीन जागांसाठी (प्रभाग क्र. २ अ, ७ ब आणि १४ ब) अखेर सुधारित निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर रोजी उशिरा जाहीर केला. चार दिवसांपूर्वी या जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे उमेदवार, प्रशासन व नागरिकांचे लक्ष या सुधारित कार्यक्रमाकडे लागले होते. न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांमुळे बाधित झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आयोगाने खालीलप्रमाणे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. आता या निवडणुकीची प्रक्रिया 4 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणार असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची प्राथमिक माहिती आहे. यासोबतच गडचांदूर नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक 8 ब आणि मूल नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक 10 ब येथील उमेदवारांनी न्यायालयात अपील दाखल केल्याने आणि याबाबत अंतिम निकाल न आल्याने येथील निवडणुका देखील पुढील निर्णयापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.

अकोला राज्यातील निवडणुक प्रक्रिया स्थगित झालेल्या 20 नगरपालिकांमध्ये अकोला जिल्ह्यातील बाळापूर नगरपालिकेचा समावेश आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबाबत न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्याने निर्णय. नगराध्यक्ष पदासह सर्व 25 जागांची निवडणूक स्थगित करण्यात आल्या आहेत. आता 20 डिसेंबरला येथे निवडणूक होणार आणि 21 डिसेंबरला मतमोजणी. निवडणूक स्थगित झाल्याने राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.

नांदेडमधील मुखेड आणि धर्माबाद नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलली आहे. आता, येथील निवडणुकांसाठी 23 तारखेला मतदान होणार असून 24 तारखेला मतमोजणी आहे. जिल्ह्यातील 13 नगरपालिकेपैकी 2 नगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या. तर भोकर, कुंडलवाडी आणि लोहा नगरपालिकेतील एका एका जागेवर निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.

बारामतीतील नगराध्यक्षांच्या निवडणुकीसह काही प्रभागातील सात जागांचा विचार करून ही निवडणूक प्रक्रिया आता 20 डिसेंबर रोज पर्यंत पुढे ढकलली आहे. साहजिकच नगराध्यक्षपदाचाही यामध्ये समावेश असल्याने बारामतीचे नगरपरिषदेचे मतदान थेट 20 डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासह ज्या सात जागांसाठी सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी नगर परिषदेची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. आता, येथे 20 डिसेंबरला मतदान होणार असून 21 डिसेंबरला मतमोजणी होत आहे. नगरसेवक पदाच्या दोन उमेदवारांनी आणि नगराध्यक्ष पदाच्या एका उमेदवारांनी अपील केल्याने निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये एका नगरसेवकपदाच्या उमेदवाराची याचिका कोर्टाने फेटाळली. मात्र, एक नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या बाजूने कोर्टाने निर्णय दिला. आकाश सुखदेव राऊत हे नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार होते. कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यांच्या नामांकनात त्रुटी काढल्याने अर्ज बाद केला होता. अपील प्रकरणात न्यायालयाचा निर्णय 25 तारखेला आला आहे. आता, अर्ज मागे घेण्यापासून पुन्हा एकदा या ठिकाणी निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!