हवेलीत निवडणुक ठरतीये मतदारांच्या हौसेचा मुद्दा ! लांबलचक ‘देवदर्शन’ व’पर्यटन’ वारी हाच निवडणुक जिंकण्याचा झालाय मुद्दा …..


उरुळी कांचन : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहितेला काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिल्यानंतर निवडणुकीच्या तयारीचा वेग अंतिम टप्प्यात आला आहे.या तयारीत सत्ताधारी राजकीय पक्षांनी विकासकामांचे उद्घाटन अथवा विकासाच्या मुद्दावर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक लढणे अपेक्षित असताना हवेली तालुक्यात विकासाचा,पॅटर्न बदलत नाही असून विकासकामे व मूलभूत समस्यांपेक्षा,तालुक्यात आता मतदारांना ‘मौज मजा ‘ घडविण्यात सत्ताधारीकामाला लागले आहेत.इच्छुकांनी मतदारांची हौस भागविण्यासाठीदेवदर्शनवारी तसेच पर्यटनवारीवर लक्ष केंद्रीत केले असून हा बदलता पॅटर्न सामान्य नागरीकांच्या प्रश्नांचा मुळावर आला आहे.

हवेली तालुक्यात निवडणुकीत निवडून येणे हा निकष आता मतदारांची हौस पुरवून घेणे हा नवीन पायंडा पडला आहे. हा निष्कर्ष गेल्या काही निवडणुकीत फळास आल्याने यंदा मात्र इच्छुकांनी हाच पॅटर्न चालू ठेवण्याचा मनसुबा आखला आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जवळ आली तर सत्ताधारी, इच्छुकांनी विकासकामांच्या जोरावर मते माघण्याची पध्दती आता,गाशात गुंडाळली आहे. यापूर्वी विकासकामांच्या मुद्द्यावर होतअसलेल्या निवडणुका आता मतदारांची हौस भागवून करण्याचा,निर्धार काही इच्छुकांनी करुन रणांगणात उतरणार असल्याचे,मनसुबे आखले असून मतदारही या प्रलोभनांना प्रभावीत झाले,आहेत.

 

हवेली तालुक्यात सामान्यतः हा मोठे प्रश्न आजही भेडसावत आहे. निमशहरी असलेल्या भागातही विजेच्या खेळ- खंडोबा तसेच वाहतुक कोंडी, कचरा ,स्वच्छता गृहे, दळणवळण तसेच आरोग्याची समस्या गंभीर आहे. सामान्यांना उपचाराच्या सुविधा मिळत नाही तर गरीबांना खर्च पडवडत नसल्याची स्थिती आहे. परंतु या समस्यावर तोडगा काढण्याची मानसिकता तयारी केलेल्या इच्छुकांत नसून त्यांनी मतदारांची हौस भागवून निवडणुक लढविण्याची तयारी आखल्याने सामान्यांच्या मूळ प्रश्नांचा निवडणुक आली असली तरी चुराडा झाला आहे.

 

हवेली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकींचा इच्छुकांचा तयारीचा आकडा कोट्यावधींत गेल्याने मतदारही या निवडणुकीचा दृष्टीकोन हौस पुरी करुन घेणे म्हणून गुंतल्याने तालुक्यात निवडणुका जवळ आल्या तरी विकासकामे,व सामान्य प्रश्नांचा बागलबुवा संपला आहे. आचारसंहितेपूर्वी निवडणुकीच्या विकासकामांच्या भूमिपूजनाची चाहूल आता.संपली असून सत्ताधारीच ‘देवा’ वर भरोसा दाखवून तयारीत,उतरल्याने निवडणुकीत विकासात्मक मुद्याचा चुराडा झाला आहे.

‘बजेट’ हाच निवडणुकीचा मुख्य प्रचार

जि.प. व पंचायत समिती च्या सार्वत्रिक निवडणुकीत इच्छुकांची,रणनीती पाहता दौरे, वाटप व इव्हेंट मॅनेजमेंट इतकीच तयारीची,चर्चा तालुक्यात सुरू आहे. सर्व उमेदवार या आघाडीवर कामकरीत आहेत. थेट मतदारपर्यंत यंत्रणा राबवून निवडणुका जिंकणे,हाच इच्छुकांचा प्रयत्न आहे. स्थानिक नेतेमंडळींची आवश्यकता,इच्छुकांना राहिली नसून थेट मतदारांपर्यंत पोहचून आपले ‘बजेट’
वापरुन बाजी मारण्याची व्यूहरचना आखली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!