कात्रज डेअरीच्या अध्यक्षांची निवड सोमवारी, निवडीकडे पुणे जिल्ह्याचे लक्ष…
पुणे : कात्रज दूध डेअरीच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सोमवारी संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक बोलविण्यात आली आहे. कात्रज दूध संघाच्या विद्यमान अध्यक्षा केशरताई पवार यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला आहे.यामुळे रिक्त झालेल्या या पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी! ५०० रुपयांच्या नोटाही बंद होणार?, RBI ने दिले स्पष्टिकरण
त्यानुसार अध्यासी अधिकारी तथा सहकार विभागाचे विभागीय दुग्ध उपनिबंधक डॉ. महेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता कात्रज डेअरीच्या मुख्यालयात संचालक मंडळाची सभा होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या संघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता असून, अध्यक्षपदासाठी इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे जोरदार फिल्डिंग लावलेली आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या तालुक्यास अध्यक्षपद मिळणार, याबद्दलची उत्सुकता दूध उत्पादक संस्था आणि शेतकर्यांमध्ये आहे.
कोल्हापूर दंगलीबाबत अजित पवार यांचे गंभीर आरोप; म्हणाले, निवडणूका समोर ठेऊन राज्यात..
दरम्यान, अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या संचालकांच्या हालचालींना वेग आला आहे. त्यानुसार वेळ मिळेल त्यानुसार राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कात्रजच्या संचालकांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.