हवेली बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप काळभोर व उपसभापतीपदी रविंद्र कंद यांची निवड ! बाजार समितीच्या सत्ताकेंद्रात भाजपचा थेट प्रवेश !!


उरुळीकांचन : पुणे ( हवेली ) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप काशिनाथ काळभोर व उपसभापती रविंद्र नारायण कंद यांची बिनविरोध निवड करण्यात  आली आहे. उपसभापतीपद भाजपच्या गोटाला देऊ केल्याने या बाजार समितीच्या सत्ता केंद्रात भाजपचा प्रवेश झाला आहे.

हवेली बाजार समितीची तब्बल १९ वर्षानंतर  संचालक मंडळाची निवडणूक होऊन राष्ट्रवादी बंडखोर पदाधिकाऱ्यांनी भाजपशी हातमिळवणी करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत पॅनेलचा १३ विरुद्ध २अशा फरकाने पराभव करीत बाजार समितीवर वर्चस्व प्राप्त केले आहे. त्यामुळे या बाजार समितीवर कोणाची वर्णी लागणार म्हणून सर्वांना उत्सुकता लागली होती.

भाजपकडूनच या बाजार समितीवर पहिल्यांदा संधी मिळावी म्हणून माजी सभापती रोहिदास उंद्रे यांनी तीव्र इच्छुकता दर्शविली होती. त्यामुळे सर्वपक्षीय पॅनेलला सभापतिपदी कोणाला पहिल्यांदा संधी द्यावी म्हणून पेच निर्माण झाला होता.

अखेर राष्ट्रवादी च्या बंडखोर गटाला सभापती पद व भाजप गटाला उपसभापती पद देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार मंगळवार (दि.९) रोजी सभापतीपदी दिलीप काळभोर व उपसभापती रविंद्र कंद यांची निवड झाली.

हवेली बाजार समितीचे यापूर्वी १९९७ रोजी  दिलीप काळभोर यांनी सभापतीपद भूषविले असल्याने त्यांना दुसऱ्यांदा संधी प्राप्त झाली आहे. तर रविंद्र कंद हे नव्याने तरुण चेहरा म्हणून उपसभापती विराजमान झाले आहेत.दिलीप काळभोर हे दिवंगत नेते अशोक काळभोर यांचे बंधू आहेत. तर रविंद्र कंद हे जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप कंद यांचे निकटवर्तीय आहेत.

दरम्यान बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक अधिकारी प्रकाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. यावेळी संचालक मंडळ उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!