Election : मोठी बातमी! पाच राज्याच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर, निवडणूक आयोगाने दिली माहिती..
Election नवी दिल्ली : एक मोठी बातमी समोर आली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. यामुळे आता रणधुमाळी सुरू होणार आहे. Election
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाना आणि मिझोराममध्ये निवडणुका होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडेय, अरुण गोयल हे पत्रकार परिषदेवेळी उपस्थित होते.
मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान होईल. ३ डिसेंबरला निकाल लागेल. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होईल. पहिल्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबरला, दुसऱ्या टप्प्यातील १७ नोव्हेंबरला मतदान होईल. राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबरला, तेलंगानात ३० नोव्हेंबरला मतदान होईल.
३ डिसेंबरला निकाल लागेल. मध्य प्रदेशमध्ये मतदान १७ नोव्हेंबरला होणार आहे. सर्व राज्यांचे निवडणुकीचे निकाल ३ डिसेंबरला लागतील. यामुळे आता निवडणुकीची तयारी सुरू होणार आहे.