निवडणूक आयुक्त मुख्यमंत्र्यांचा घरगडी ; मतदानातील गोंधळानंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, केली मोठी मागणी?


पुणे: महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकाच्या निवडणुकीला मतदानाला सुरूवात झाली असताना दुबार मतदार, मतदार यादीतील घोळ, तसेच शाही पुसली जात असल्याच्या तक्रारीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट राज्य निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल चढवला आहे.निवडणूक आयुक्त हा मुख्यमंत्र्यांचा घरगडी म्हणून काम करत असल्याची सडकून टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,मुंबई महापालिकेची निवडणूक 9 वर्षांनी होत आहे. तरीही इतका गोंधळ कसा होत आहे. निवडणूक आयोग, आयुक्त आणि कर्मचारी काय काम करतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.. हे दररोज काय काम करतात याची माहिती रोज निवडणूक आयोगाच्या साईटवर अपडेट व्हायला हवी अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

निवडणूक आयुक्त नक्की कसला पगार खातात? असा संतप्त सवाल देखील ठाकरेंनी केला आहे. या निवडणुकीत शाई पुसली जाण्याचा प्रकार समोर येत आहे. यावरून निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर ठाकरेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत भाजप आणि त्यांच्या मंडळींनी यासाठी पुरेपूर प्रयत्न केला असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

निवडणूक आयुक्त मुख्यमंत्र्यांचे नोकर आहेत, या निवडणूक आयुक्तांना काहीच काम नाही. पैसे वाटले. सोशल मीडियातून बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहे. साम-दाम दंड भेद केला. तरीही काहीच कारवाई होत नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयुक्तांना निलंबित करा अशी मागणी त्यांनी केली. निवडणूक आयुक्त लाचारी करत आहेत, अशी सणसणी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!