Election Commission : ब्रेकिंग! शिंदे सरकारला निवडणूक आयोगाचा मोठा धक्का, दिले महत्वाचे आदेश…

Election Commission : मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्या बदलीसंदर्भात निवडणूक आयोगाने राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे सरकारला दणका दिला आहे. चहल यांची बदली रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांना 3 वर्षांच्या निकष लावू नये अशी मागणी राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे केली होती.
राज्य सरकारची याचिका आयोगाने मंगळवारी फेटाळली आहे. त्यामुळे आता चहल यांच्याबरोबरच अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि अन्य काही अधिकाऱ्यांच्या बदल्या सरकारला कराव्या लागणार आहेत.
निवडणूक आयोगाकडून गेल्या आठवड्यांमध्येच ३ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ पदावर असणाऱ्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या कराव्यात, असा आदेश देण्यात आला होता.
अशातच आता निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे चहल यांच्याबरोबरच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्याच लागतील. थेट निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग नसल्याने आयुक्त तसेच उपायुक्तांना आदेशातून वगळावे, अशी विनंती राज्य सरकारकडून करण्यात आली होती. Election Commission
असं एक पत्रच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने निवडणूक आयोगाला पाठवलं होतं. पण हे पत्र आयोगाने फेटाळून लावले आहे. यामुळे शिंदे सरकारला मोठा धक्का बसला आहे.