एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना खोचक टोला, म्हणाले, विचार पुढे असतात आणि लाचार…


मुंबई : सध्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहे. काल ते इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी सहभागी झाले होते. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, संजय राऊतही नवी दिल्लीत गेले होते. या इंडिया आघाडीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी निवडणुकीत खोट्या मतदारांद्वारे कसे मतदान होत आहे.

तसेच त्याला भाजप आणि निवडणूक आयोगाची कशी साथ आहे, याचे प्रेझेंटेशन केले. या बैठकीत एक फोटो व्हायरल झाला होता. त्यामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे खूप मागे, शेवटच्या रांगेत बसल्याचे दिसत होते. आता यावरुन सध्या राजकारण रंगताना दिसत आहे.

दरम्यान,या फोटोवरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. विचार पुढे असतात आणि लाचार मागे असतात, अशी खोचक टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

मला काही प्रतिक्रिया द्यावीशी वाटत नाही. ज्यांचा अपमान झाला आहे, त्यांना जर त्यांचं काही वाटत नसेल तर यावर काय प्रतिक्रिया देणार? खरं म्हणजे ज्यांचा अपमान झालाय, त्यांना त्याचं काही वाटत नसेल तर मला त्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही.

जे स्वाभिमान गहाण टाकतात, बाळासाहेबांचे विचार सोडतात, त्यांना त्याचं काही वाटणारच नाही. काँग्रेसने त्यांना त्यांची जागा दाखवली असेल. मी त्याच्यावर काही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. उलट तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे की, तुम्हाला एवढं मागे का बसवलं?”, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!