Eknath Shinde : एकनाथ शिंदे नवा डाव टाकणार? नव्या ५ चेहऱ्यांना संधी देणार, आतली माहिती आली समोर..


Eknath Shinde : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्याने राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झालं आहे. अशातच ५ डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचे नवीन सरकार स्थापन झालेल असलं तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यातच आता अनेक आमदार मंत्रीपद मिळावे, यासाठी लॉबिंग करत आहेत.

अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवीन डाव टाकणार आहेत. एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून ५ नवीन चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी देणार आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, येत्या १४ डिसेंबरला मंत्रीमंडळ विस्तार केला जाणार आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात रात्री एक बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळ खात्याच्या वाटपावरून चर्चा करण्यात आली. Eknath Shinde

यानंतर आज मंत्रिमंडळ विस्ताराच्या बाबतीत एक अंतिम बैठक होईल, असे बोललं जात आहे. त्यातच आता मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाकडून दोन मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे. तर ५ नवीन आमदारांना मंत्रि‍पदाची संधी मिळणार आहे.

मंत्र्यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी शिवसेनेच्या माजी आणि संभाव्य मंत्र्यांची नावे समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट केला जाणार आहे.

गेल्या मंत्रिमंडळात गुलाबराव पाटील, शंभुराज देसाई, उदय सामंत, तानाजी सावंत, दादा भुसे, दीपक केसरकर यांच्याकडे मंत्रीपदे देण्यात आली होती. आता भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, विजय शिवतारे या पाच जणांना मंत्रिपदाची संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या पाच नवीन चेहऱ्यांपैकी भरत गोगावले हे कोकणातले आहेत. शिवसेना कोकणात वाढवण्यासाठी भरत गोगावले यांना मंत्रि‍पदाची संधी दिली जाईल, असे म्हटले जात आहे. तर संजय शिरसाट, अर्जुन खोतकर हे दोघेही मराठवाड्यातील नेते आहेत.

मराठवाड्यात पक्षविस्तारासाठी त्यांची मदत होणार आहे. तसेच प्रताप सरनाईक हे ठाणे, तर विजय शिवतारे हे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. या दोघांचाही जिल्ह्यात पक्ष विस्तारासाठी फायदा होईल, यासाठी मंत्रिपद दिले जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!