Eknath Shinde : राज्यात २६ नोव्हेंबरनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील की नसतील? बड्या नेत्याने सगळं गणितच सांगितलं…

Eknath Shinde : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.

तसेच २६ नोव्हेंबरला सध्याची विधानसभा बरखास्त झाल्यानंतर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
आज दिवाळीचा सण आहे महाराष्ट्रात या वेळेला दिवाळी अधिक आनंदाने साजरी होईल. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात नरकासुरांचा आवाज झाला पण तरी नरकासुर कुठे वळवत असतील. तर या राज्याच्या मतदार राजा त्या वळवळणाऱ्या नरकासुराला त्याची जागा दाखवतील. Eknath Shinde

जनतेला यापुढे महाराष्ट्रातला स्वाभिमानाने सुखाचे दिवस यावे यासाठी आमचे प्रयत्न राहतील महाविकास आघाडीचे आणि वातावरण अत्यंत पोषक आहे. कोणी काहीही म्हणू द्या. पुढल्या दिवाळीला या राज्यात महाविकास आघाडीच्या सरकार असेल आणि जनतेच्या मनात आनंद अधिक झालेला दिसेल, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
आमच्या महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा होणार आहेत. सहा तारखेला राहुल गांधी येत आहेत संध्याकाळी बीकेसी मैदानावर संयुक्त सभा आहे. राहुल गांधी, माननीय उद्धव ठाकरे आणि शरद पवार या सभेला असतील, असे संजय राऊत म्हणाले आहे.
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाढलेल्या जवळीकीवर संजय राऊतांनी भाष्य केले आहे. राज ठाकरे आणि फडणवीस यांचे सूर जुळत असतील. एकेकाळी हेच नेते होते. राज ठाकरे हे अमित शाह आणि मोदींना पाय ठेवू देऊ नका ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत. असे सांगणारे हेच नेते होते आता असं काय झाले गेले एक महिन्यात महाराष्ट्राचे शत्रू आहेत ते महाराष्ट्राचे तारणहार आहेत असे वाटू लागले, असं टोला संजय राऊतांनी राज ठाकरेंना लगावला आहे.