राज्याच्या राजकारणात खळबळ! पुढील दोन महिन्यांत एकनाथ शिंदे पुन्हा होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य…

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी पुन्हा स्वतःची पॉवर काय आहे हे दाखवून दिलं आहे. राज्यात आगामी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत आम्ही वेगळे लढणार असल्याचं भाजप सांगत होतं. मात्र, आता त्यांना माघार घ्यावी लागणार आहे. कारण युती करुन लढू अस सांगण्यात आलं आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शाह यांना भेटले आहेत. एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांना खिशात घातलं आहे, ही त्यांची किमया असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. सर्व पालिकेत शिंदे आणि भाजप युती मध्ये लढणार आहे.
विधानसभा झाली आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं नाही त्याचा बदला असावा. त्यावरून असं दिसत आहे की एकनाथ शिंदे येत्या महिना दोन महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होतात का? असं वाटत असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. शरद पवार चाणक्य आहेत.

दरम्यान, काही काळापूर्वी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी योग्य संदेश दिला होता. मला हे आणि असच दिसत आहे. अमित शाह सारख्याला ते खिशात घालतात असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहे.
महापालिका निवडणुकीच्या मुद्यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, खेळ आता सुरु झाला आहे. NDA मध्ये अजून काही होणार का? हे पाहू आणि मग कुठं जायचं ते ठरवू असेही आंबेडकर म्हणाले. पण युती करुनच महापालिका निवडणुका आम्ही लढणार आहोत, असेही आंबेडकर म्हणाले. नगरपालिका निवडणुकीत आम्ही युती करुन लढलो. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील युती करु असेही ते म्हणाले.