Eknath Shinde : मराठा आरक्षण प्रकरणी एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका, म्हणाले, आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टात…
Eknath Shinde : मराठा आंदोलक आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. केंद्रसरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा मी आमच्या पक्षाच्या खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी पाठवणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलकांना आश्वासन दिले.
यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरे स्वतःवर काहीही घ्यायचं नाही. केवळ दुसऱ्याच्या कोर्टात चेंडू टाकून मोकळं व्हायचं आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना ते राज्याचे मुख्यमंत्री होते.
त्याआधी सरकारने देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मी त्यावेळी फडणवीसांबरोबर होतो. ते आरक्षण हायकोर्टात टिकलं. मात्र महाविकास आघाडी ते आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवू शकली नाही. हे त्याचे अपयश आहे. Eknath Shinde
त्यामुळे आमच्या सरकारची भूमिका स्पष्ट आहे, आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. १० टक्के आरक्षण देऊन आम्ही तसा निर्णय देखील घेतला आहे. अजूनही मराठा समाजातील कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्रं देण्याचे काम चालू आहे.
शिंदे पुढे म्हणाले, आम्ही मराठा समाजासाठी अनेक योजना लागू केल्या आहेत. मात्र त्यांना दोन समाजात तेढ निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजायची आहे. मात्र हे दोन समाज (मराठा व ओबीसी) सुज्ञ आहेत. आरक्षण देणारं सरकार कोणाचं आणि या प्रकरणातून पळवाट शोधणारं सरकार कोणाचं, हे या दोन्ही समाजांना चांगलंच ठाऊक आहे. असे ते म्हणाले आहे.