Eknath Shinde : लक्ष्मण हाकेंनी उपोषण स्थगित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
Eknath Shinde : राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रचंड तापला आहे. जालन्यातील वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेआणि नवनाथ वाघमारे हे गेल्या १० दिवसांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको, या मागणीसाठी उपोषणाला बसले होते.
मात्र, आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने हाके आणि वाघमारे यांची भेट घेतली. शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेअंती लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण स्थगित केले. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर होते. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरले आहेत. महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकांचा धडाका लावला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाबाबत भाष्य केले आहे.
शिंदे म्हणाले, काल बैठक झाली होती. कालच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतरही सर्वजण उपस्थित होते. समाजा-समाजात तेढ निर्माण होवू नये, यासाठी चर्चा करण्यात आली. मराठा आणि ओबीसी समाजात वाद होवू नये, यासाठी चर्चा झाली. Eknath Shinde
अधिवेशनाच्या काळात काही मुद्द्यांवर सर्वपक्षीय बैठक घेण्याचे ठरवण्यात आले आहे. लक्ष्मण हाके यांनी आंदोलन मागे घेतले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.