एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; मुंबईतील बड्या नेत्याला डावलून राज्यसभेवर ‘या’ महिलेला संधी..


मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील 10 राज्यांमधील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 37 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील सात जागांचा यामध्ये समावेश आहे.विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीच्या सहा उमेदवारांची निवड निश्चित आहे.अशातच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवाराची निवड जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी धक्कातंत्राचा वापर करत ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निकटवर्तीय असलेल्या राहुल शेवाळे यांना उमेदवारी देतील अशा चर्चा रंगल्या असताना त्यांना डावलून त्यांनी ज्योती वाघमारे यांना संधी दिली आहे. आता विधानभवनात ज्योती वाघमारे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकनाथ शिंदे तिथे उपस्थित आहेत. शेवटच्या क्षणी राहुल शेवाळे यांचे नाव मागे पडल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नव समीकरण तयार होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

राहुल शेवाळे लोकसभा निवडणुकीला हरले तेव्हा ते विद्यमान खासदार होते. 2022 साली शिवसेनेत फूट पडली. बहुतांश आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यानंतर काही महिन्यांनी राहुल शेवाळे यांनी एकनाथ शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतला. राहुल शेवाळे हे शिवसेनेतले अनुभवी, दांडगा जनसंपर्क असलेले नेते आहेत. त्यांच्या जागी ज्योती वाघमारेंची निवड हा एक धक्का आहे.

दरम्यान ज्योती वाघमारे या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आक्रमकपणे बाजू मांडत असतात. या राज्यसभेसाठी त्यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!