एकनाथ शिंदेंनी डाव टाकला!श्रीकांत शिंदेंसह 39 नेत्यांवर मोठी जबाबदारी, लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुखांची यादी समोर..


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जोरदार कंबर कसली आहे.शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने राज्यातील 48 लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुखांची घोषणा केली आहे. यामध्ये मुंबईसह ठाणे लोकसभेची जबाबदारी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

शिंदेंच्या शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 48 मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुखांची घोषणा करण्यात आली आहे..यात मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, ईशान्य मुंबई व दक्षिण मुंबई या मुंबईतील सर्व सहा लोकसभा मतदार संघांच्या संपर्कप्रमुख पदाची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

खासदार डॉ. शिंदेंसोबत मंत्री योगेश कदम, आमदार निलेश राणे, माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यावर मुंबईच्या लोकसभा मतदार संघांची जबाबदारी असेल. तसेच ठाणे लोकसभेचे संपर्कप्रमुखपद देखील खासदार डॉ. शिंदेंकडे सोपवण्यात आले आहे, असे पक्षाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

लोकसभा मतदार संघनिहाय संपर्कप्रमुख

१) मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, ईशान्य मुंबई व दक्षिण मुंबई – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

२) ठाणे – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

३) भिवंडी व कल्याण – खासदार नरेश म्हस्के

४) नंदुरबार – माजी आमदार शिरीष चौधरी

५) धुळे व दिंडोरी – शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी

६) जळगाव – आमदार दिलीप लांडे

७) रावेर – आमदार तुकाराम काते

८) बुलढाणा – संजय सोनार

९) अकोला – माजी आमदार राजन साळवी

१०) अमरावती – आमदार किशोर अप्पा पाटील

११) वर्धा – आमदार डॉ. मनीषा कायंदे

१२) रामटेक – अनिल कोकीळ

१३) नागपूर – माजी खासदार संजय निरुपम

१४) भंडारा-गोंदिया – विलास चावरी

१५) गडचिरोली- चिमूर – माजी मंत्री जगदीश गुप्ता

१६) चंद्रपूर – आमदार कृपाल तुमाने

१७) यवतमाळ – वाशिम – शिवसेना उपनेत्या प्रिती बंड

१८) हिंगोली – शिवसेना उपनेते आनंदराव जाधव

१९) नांदेड – दत्ता दळवी

२०) परभणी – भास्कर आंबेकर

२१) जालना – खासदार संदिपान भुमरे

२२) छत्रपती संभाजी नगर – विलास पारकर

२३) नाशिक – आमदार सुहास कांदे

२४) पालघर – पांडुरंग पाटील

२५) रायगड – अनिल नवघरे

२६) कोल्हापूर, मावळ व पुणे लोकसभा – मंत्री उदय सामंत

२७) बारामती – किरण लांडगे

२८) शिरुर – आमदार शरद सोनवणे

२९) अहिल्यानगर – शिवसेना सचिव राम रेपाळे

३०) शिर्डी – खासदार डॉ. ज्योती वाघमारे

३१) बीड – मनोज शिंदे

३२) धाराशिव – माजी खासदार उन्मेष पाटील

३३) लातूर – मंगेश कुडाळकर

३४) सोलापूर – खासदार धैर्यशील माने

३५) माढा – चंद्रहार पाटील

३६) सांगली – योगेश जानकर

३७) सातारा – शरद कणसे

३८) रत्नागिरी – राजेश मोरे, नगरसेवक

३९) सिंधूदुर्ग – बाळा चिंदरकर

४०) हातकणंगले – आमदार सुहास बाबर

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!