Eknath Shinde : पुणे कार अपघातात अल्पवयीन मुलाला जामीन मिळाल्यानंतर जामीनाविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय, आरोपी अडकणार…


Eknath Shinde : कल्याणीनगर पोर्शे कार अपघाताबाबत आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला उच्च न्यायालयाने मागील आठवड्यात जामीन दिला होता. या जामिनाला विरोध करण्यासाठी पुणे पोलिसांना मुख्यमंत्र्यानी हिरवा कंदील दाखवला आहे

याबाबत सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी पुणे पोलिसांकडून राज्य सरकारकडे परवानगी मागण्यात आली होती. उच्च न्यायालयाने २५ जूनला आरोपीला जामीन दिला होता. १९ मे रोजी अपघातानंतर पोलिसांनी आरोपीला बालसुधारगृहात पाठवले होते. मात्र काही तासातच त्याला जामीन दिला होता. Eknath Shinde

तसेच १९ मे रोजी अपघातानंतर पोलिसांनी आरोपीला बालसुधारगृहात पाठवले होते. मात्र काही तासातच त्याला जामीन दिला होता. मात्र यानंतर रोष उफाळून आल्यांनतर पुन्हा एकदा अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली.

२५ जून रोजी अल्पवयीन आरोपीला बालसुधार गृहातून मुक्त केल्यानंतर त्याचा ताबा त्याच्या आत्याकडे देण्यात आला होता. आरोपीच्या आत्याने मुलाची अटक बेकायदेशीर असल्याचे सांगून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने ही मुक्तता केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!