Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी विनोद पाटील यांच्या घरून जेवणाचा बडा, राजकीय समीकरण बदलणार?

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या लोकसभा निवडणूक प्रचारासाठी राज्यभरात फिरत आहेत. काल बुलडाणा येथील सभेला जाण्यासाठी ते संभाजीनगर मार्गे गेले. तसेच, मुंबईला परत जातांना मराठा आरक्षण याचिकाकर्ते व छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असलेले विनोद पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री त्यांच्या निवासस्थानी जाणार असल्याची चर्चा होती.
परंतु बुलडाण्याहून परतण्यास मुख्यमंत्री शिंदे यांना रात्रीचे बारा वाजले. त्यामुळे विनोद पाटील हे स्वत: चिकलठाणा विमानतळावर जाऊन त्यांना भेटले. पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांचे त्यांनी स्वागत केले. घाईत दौरा झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे जेवण राहिले होते, त्यांच्यासाठी विनोद पाटील यांच्या घरून खास डबा मागवण्यात आला होता.
युवासेनेचे कार्यकर्ते तथा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम पाहणारे अमर लोखंडे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना जेवणाचा डबा पाठवण्यात आला होता. डब्यामध्ये आलू मटार, पनीर, मेथीची भाजी, चपाती-भाकरी आणि गुलकंदचा हलवा असे पदार्थ होते. मुख्यमंत्र्यांच्या वतीने त्यांच्या सहकाऱ्यांनी हा डबा स्वीकारला. सहकाऱ्यांनी हा डबा स्वीकारला. त्यानंतर विनोद पाटील आणि त्यांच्या कार्यकर्ते विमानतळावरून परतले. अगदी काही मिनिटांची ही भेट होती. Eknath Shinde
परंतु या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे बोलले जाते. लोकसभेच्या जागा वाटपावरून महायुतीतील भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये काही मतदारसंघाबद्दल वाद आहेत. चर्चेच्या अनेक फे-या झाल्या, बैठका झाल्या पण त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यास इच्छूक असणाऱ्यांमध्ये विनोद पाटील यांचे नाव आघाडीवर होते.
शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यास आपण इच्छूक आहोत, उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक लढवणार, अशी घोषणा यापुर्वीच विनोद पाटील यांनी केली होती दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरेयांची उमेदवारी निश्चित झाली असून त्यांच्या नावाच्या घोषणेची केवळ औपचारिकता शिल्लक असल्याचे ठामपणे सांगितले जात आहे.