Eknath Shinde : आताची सर्वात मोठी बातमी! मराठा आरक्षण प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे आदेश..

Eknath Shinde : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरदार पेटला आहे. मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत. तर मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वर्षा निवासस्थानी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

या बैठकीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त तसेच निवृत्त न्यायमूर्ती यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
सध्या अजूनही अनेक गावे आहेत ज्या ठिकाणी कुणबी नोंदी सापडल्या नाहीत. मात्र ज्या गावात कुणबी नोंदी सापडल्या नाही त्या ठिकाणी फेर तपासणी करा. कुणबी नोंदी सापडल्यावर त्याचे जात प्रमाणपत्र युद्ध पातळीवर द्या.

सापडलेल्या नोंदीची माहिती होण्यासाठी गावोगावी जनजागृती करा. राज्य मागासवर्गीय आयोगाद्वारे सुरू असलेला सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल आहे. Eknath Shinde
त्याचबरोबर वंशावळीसाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत. पूर्ण शक्ती एक वटून सामाजिक भावनेने काम करा. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असं वक्तव्य देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
दरम्यान, सरकारने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत नोंदींवरुन १ लाख ४७ हजार कुणबीचं जातप्रमाणपत्र वाटप करण्यात आलंय. एकट्या मराठवाड्यात ३२ हजार नोंदी आढळल्या असून १८ हजार ६०० कुणबी जातप्रमाणपत्र वितरित करण्यात आलेत.
मात्र जरांगे आता सरकारला अधिक वेळ देण्यास तयार नाही. कितीही नोटीस पाठवल्या आणि मुंबईकडे येण्यापासून रोखलं तरी ऐकणार नाही, असा पवित्रा जरांगेंचा आहे.