एकनाथ शिंदेंनी आणल्या पैशांच्या बॅगा, व्हिडीओ समोर आल्याने उडाली खळबळ…


मालवण : स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मालवणमध्ये तापलेलं राजकारण आणखी चिघळलं आहे. मालवणात सोमवारी रात्री भाजप कार्यकर्त्यांना पैशांचे वाटप करताना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी पकडले. त्यानंतर भाजप विरुद्ध शिंदे गट हा वाद चांगलाच पेटला.

त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांच्यावर मतदारांना पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केला आहे. वैभव नाईक यांनी शिंदे गटाच्या धोरणांवर सडकून टीका करत मालवणच्या जनतेला विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

माजी आमदार वैभव नाईक यांनी नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत पुरावा दिला आहे. त्यासोबतच त्यांनी काही सविस्तर माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मालवण दौऱ्यावर पैशांच्या बॅगा घेऊन आले होते, असा दावा वैभव नाईक यांनी केला आहे.

वैभव नाईक यांनी सांगितले की, एकीकडे निलेश राणेंनी भाजप पक्षावर मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप केले परंतु निलेश राणे आणि शिंदे- शिवसेना देखील धुतल्या तांदळासारखी नाही. परवा एकनाथ शिंदे मालवणात आले तेव्हा त्यांच्या मागून त्यांचे बॉडीगार्ड पैशाच्या बॅगा घेऊन कॅमेरा पासून लपण्यासाठी धावत आहेत हे वरील व्हिडीओत स्पष्ट दिसून येत आहे. हेच पैसे काल निलेश राणेंनी मालवण मधील मतदारांना वाटले असल्याचा आरोप नाईक यांनी केला.

       

वैभव नाईक यांनी पुढे म्हटले की, राज्यात सत्तेत राहून जनतेच्या पैशात भ्रष्टाचार करून मिळविलेला हा पैसा आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच धोरण सध्या शिंदे गटाकडून प्रत्येक निवडणुकीत राबविले जात असल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला. वैभव नाईक यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील ट्वीट करत सवाल उपस्थित केला आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!