Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांची अमित शहांकडे मोठी मागणी! मुख्यमंत्रीपदाचा त्याग करू, पण….


Eknath Shinde : राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर गुरूवारी रात्री काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यातील मुख्यमंत्रिपदासह इतर महत्वाच्या पदांबाबत चर्चा केल्याची माहिती आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील आपला दावा सोडला असला आणि सरकार स्थापन करण्यात आपला कोणताही अडसर येणार नसल्याचा शब्द भाजपला दिला असला तरी, मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंच्या शिवसेनेने अनेक महत्त्वाच्या खात्यांची मागणी केल्याची माहिती आहे.

शिवाय पालकमंत्री पद देतानाही पक्षाचा योग्य तो सन्मान राखला दावा अशी विनंती शिंदेंनी शहांना केल्याची माहिती आहे. त्यामुळे आता शिंदेंच्या मागणीचा विचार भाजपचे वरिष्ठ नेते किती करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर कालच्या बैठकीत शिवसेनेच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचीही माहिती आहे. Eknath Shinde

दिल्लीतील बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना अमित शहांसोबत सकारात्मक बैठक झाल्याची माहिती दिली. तसंच आज पुन्हा मुंबईत बैठक होणार असल्याचंही शिंदेंनी सांगितलं.

ते म्हणाले, आमच्यात समन्वय आहे. आम्ही सकारात्मक आहोत. सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा झाली. मी काळजीवाहू मुख्यमंत्री असून सगळ्यांची काळजी मी घेत आहे. लाडकी बहीण फेमस आहे तसाच लाडका भाऊ फेमस आहे. अजिबात घाई करू नका, मी सगळ्याची काळजी घ्यायला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group