मुंबईला जाण्याआधी घडामोडींना वेग!! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्याकडे पाठवला चर्चेसाठी खास माणूस…


मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उद्या आरक्षणासाठी मुंबईला निघणार आहेत. यामुळे राजकीय वातावरण तापले आहेत. आता मनोज जरांगे पाटील यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी राज्य सरकारने पहिले पाऊल टाकले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: वाटाघाटींना आणि चर्चेला सुरुवात केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) राजेंद्र साबळे हे आज सकाळी मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीत पोहोचले आहेत. यामुळे नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र ही चर्चा केवळ जाण्याचा मार्ग कोणता असणार यासाठी असल्याचे सांगितले जात आहे.

राजेंद्र साबळे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात सध्या चर्चा सुरु आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींकडून मनोज जरांगे पाटील यांना मराठा मोर्चाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली जाईल, अशी चर्चा आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत अनेक घडामोडी घडत आहेत.

दरम्यान, मराठा मोर्चा मुंबईत आल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाऊल पुढे टाकले आहे. याबाबत मात्र जरांगे ठाम असून अनेक ठिकाणाहून गाड्या निघाल्या आहेत. अनेकांनी वर्गणी करून गाड्या केल्या आहेत.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याबाबत ते म्हणाले, मार्ग कसा असेल याबाबत सविस्तर चर्चा केली आहे. आता पुढे काय घडणार हे लवकरच समजेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!