एकनाथ खडसेंच्या जावयाचे पाय आणखी खोलात, ७ ते ८ महिलांनी घेतली पोलिसात धाव, संबंध ठेवतानाचे व्हिडिओ…

पुणे : पुणे पोलिसांनी खराडी भागात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकून एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर याच्यासह इतर काही जणांना ताब्यात घेतले. धक्कादायक बाब म्हणजे या पार्टीत काही महिलांचा देखील समावेश होता.

या रेव्ह पार्टीनंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली. सातत्याने गंभीर आरोप ही केली जात आहेत. खेवलकरच्या मोबाईलमध्ये अश्लील फोटो आणि व्हिडीओ सापडली आहेत. आता याच प्रकरणात अनेक महिलांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सात ते आठ महिलांनी पोलिसांना संपर्क साधून गंभीर आरोप केले आहेत. खेवलकरने संबंध ठेवताना चोरून व्हिडीओ व ऑडिओ रेकॉर्डिंग केल्याचा महिलांचा आरोप आहे. यातील काही पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते. त्यामुळे खेवलकरच्या विरोधात आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सदर महिलांनी सांगितलं की, त्यांची सहमती नसताना त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करण्यात आले. यामुळे त्या भयभीत झाल्या असून आता पोलिसांकडे मदत मागत आहेत. या धक्कादायक खुलाशामुळे प्रांजल खेवलकरची अडचण अधिकच वाढली आहे.
पुणे पोलिसांनी आधीच रेव्ह पार्टीतून खेवलकरला ताब्यात घेतलं आहे. त्याचवेळी या पार्टीत काही महिलांचा सहभाग असल्याचंही समोर आलं होतं. आता स्वतंत्रपणे महिलांनी पोलिसांकडे धाव घेतल्याने तपासाला नवं वळण मिळणार आहे.
राज्य महिला आयोगाने अलीकडेच पत्रकार परिषद घेऊन खेवलकरवर गंभीर आरोप केले होते. काही महिलांना चित्रपटात काम देण्याचं आमिष दाखवून पार्टींमध्ये नेलं जात असल्याचा दावा करण्यात आला होता. त्याचबरोबर काही व्हिडीओंमध्ये स्वतः खेवलकर दिसत असल्याचाही आयोगाने दावा केला होता.
या सर्व प्रकरणात रोहिणी खडसे सतत पतीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, महिलांनी थेट पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी अजून कोणतंही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे रोहिणी खडसे आता या नव्या आरोपांवर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.