Eknath Khadse : मोठी बातमी! एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये जाणार, राज्यात राजकीय घडामोडींना वेग….


Eknath Khadse : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच पक्षांनी तिकीट नाकारल्याने नाराज नेतेमंडळी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत.

सध्या अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ खडसे यांची घरवापसी होणार असून लवकरच ते भाजप प्रवेश करणार आहेत . आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त निश्चित होणार असल्याची माहिती आहे.

एकनाथ खडसे सोबत आल्यास उत्तर महाराष्ट्रातल्या जागांवर भाजपला उमेदवारांना निवडून आणण्यास मदत होईल. मागील काही दिवसांपासून राज्यातील तसेच केंद्रीय नेतृत्वातील नेते एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेश करावा अशी विनंती करत असल्याची माहिती आहे. जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत बातचीत केल्यानंतर एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीला रामराम करत भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. Eknath Khadse

       

दरम्यान, एकनाथ खडसे हे सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधानपरिषद सदस्य आहेत. तर त्यांच्या कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे आता रोहिणी खडसेंच्या पदाबद्दल शरद पवार हे काय निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!