Egg Price : थंडीत अंडी महागली!! आता कॅरेटसाठी किती ‘इतके’ रुपये मोजावे लागणार, जाणून घ्या…

Egg Price : मागील काही दिवसांपासून राज्यात थंडीचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी तापमान ५ अंशापेक्षा खाली गेले आहे. तसेच हिवाळ्याच्या दिवसात थंडी वाढत असल्याने अंडी खाणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. यामुळे अंड्याची मागणीत वाढ झाली असून अंड्याच्या दरावर परिणाम होत आहे.
अलिकडच्या काळात, किरकोळ बाजारात ३० अंड्यांचा कॅरेट १८० रुपयांना मिळत होता, मात्र आता हा दर २०० रुपयांवर पोहोचला आहे. किरकोळ दरात ५ रुपयांनी मिळणारे अंडे आता ७ रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनतेला महागाईचा फटका सहन करावा लागणार आहे. Egg Price
मागील काही दिवसांपासून राज्यात थंडीचे प्रमाण वाढले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तापमान १० अंशाच्या खाली घसरल्याचे पाहायला मिळत आहे. तापमानात घसरण होताच दरवर्षीप्रमाणे अंड्यांचे दर देखील वाढले आहेत. होलसेल दरात मिळणाऱ्या अंड्याच्या कॅरेटला २०० रुपयांचा भाव आला आहे.१८० रुपये दराने मिळणारे अंड्याचे कॅरेट आता २०० रुपयांवर पोहोचले आहे.
१० रुपयांना गावरान कोंबडीची अंडी…
किरकोळ दरात ५ रुपयांनी मिळणारे अंडे आता ७ रुपयांना मिळणार आहे. गावरान कोंबडीच्या अंड्यांच्या दरात ही मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ८ रुपये दराने मिळणाऱ्या गावरान कोंबडीची अंडी आता १० ते १२ रुपयांना मिळणार असल्याने सर्व सामान्यांना महागाईचा फटका सहन करावा लागणार आहे.