Education : शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठी बातमी! आता मुलींना मोफत शिक्षण मिळणार, राज्य सरकारचा धडाकेबाज निर्णय..
Education : मुलींच्या शिक्षणासंदर्भात महत्वाची बातमी येत आहे. येत्या जूनपासून राज्यात ज्या मुलींच्या पालकांचे आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे त्यांना मेडिकल असो की इंजिनिअरिंग जवळपास ६०० अभ्यासक्रमांचे शिक्षण मोफत दिले जाणार आहे. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील यांनी ही घोषणा केली आहे. या योजनेत ६०० वेगवेगळे अभ्यासक्रम घेण्यात आले आहेत.
इंजिनिअरिंग, मेडिकल सारख्या अभ्यासक्रमांना पालकांचे लाखो रुपये खर्च होतात. मेडिकलसाठी तर करोड रुपये लागतात. यामुळे सामान्य घरातील मुले शिकू शकत नव्हती. त्यांच्या आता शिक्षणाची दारे उघडणार आहेत.
कार्यक्रमानंतर मंत्री चंद्रकांत पाटील व्यासपीठावरून बाहेर पडत असताना विद्यार्थी तरुणांनी त्यांना अडवत केवळ मुलींना सवलत देण्याच्या बाबत नाराजी व्यक्त केली. राज्यातील मुलींप्रमाणेच आम्हालासुद्धा शिक्षणाची मोफत शिक्षण द्या अशी मागणी विद्यार्थ्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. Education
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे याबाबत संवेदनशिल असून त्यांच्यापर्यंत हा निरोप पोहोचवतो असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मात्र मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमचं ऐकूनच घेतलं नाही असा आरोप यावेळी विद्यार्थ्यांनी केला आहे.