इराण-इस्रायल युद्धामुळे खाद्यतेलांचे दर गगनाला भिडले, तब्बल 65 हजार करार रद्द, जाणून घ्या….


दिल्ली : सध्या सुरू असलेल्या इराण-इस्रायल युद्धाचे परिणाम आपल्या देशावर होऊ लागले आहेत. यामध्ये खाद्यतेलाच्या दरात आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी वाढ झाल्याने आयातदारांनी ६५ हजार टनांचे करार रद्द केले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे दराबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

या युद्धामुळे येत्या काळात इंधन महागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे जगभरातील प्रमुख खाद्यतेल आयातदार देशांनी पामतेलाचा उपयोग जैवडिझेलसाठी करण्यास सुरुवात केली आहे. पामतेलच्या दरात अचानक मोठी वाढ झाली आहे. मे महिन्यात पामतेलाचे दर नीचांकावर होते. आता मात्र त्यात एकाएकी ८ टक्क्यांची वाढ झाली आहे.

भारत हा जगातील सर्वाधिक खाद्यतेल आयातदार देश आहे. भारतात ६५ टक्के खाद्यतेल आयात पामतेलाची असते. यामुळे आता ६५ हजार टनाचे करार रद्द होणे, हा मोठा आकडा असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे येणाऱ्या काळात किती बदल होणार हे लवकरच समजणार आहे.

दरम्यान, इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धविराम स्थिर राहिल्याने बुधवारी तेलाच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. मागील दोन सत्रांमध्ये मोठी घसरण झाल्यानंतर गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला होता. अमेरिकेने इराणच्या अणु केंद्रांवर हल्ला केल्यानंतर तेलाच्या किमतीत वाढ झाली होती. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!