अशोक खरात प्रकरणात ईडीची एन्ट्री!पहाटे नाशिकसह पुण्यात 11 ठिकाणी छापा, फार्महाऊसवरही सर्च ऑपरेशन


पुणे : महिलांचे लैंगिक शोषण आणि अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या नाशिकच्या भोंदू बाबाचे फासे आता फिरले आहेत. सध्या अशोक खरात हा पोलीस कोठडीत आहेत. मात्र या खरात प्रकरणात ईडीची एन्ट्री झाली आहे.आज पहाटेपासून ईडीने अशोक खरात याच्याशी संबंधित एकूण 11 ठिकाणांवर छापेमारी केली आहे.

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात हा महिलांचे शोषण अत्याचार यावरच नाही थांबला तर त्याने आर्थिक लूट करण्यासाठी भोंदूगिरी च्या नावाखाली अनेक भक्तांना गंडा लावला. त्यात आता ईडीचा ससेमिरा खरातच्या पाठीमागे लागला आहे.नाशिक, पुणे आणि शिर्डी अशा एकूण 11 ठिकाणी ईडीच्या पथकांनी सर्च ऑपरेशन राबवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये बँकिंग क्षेत्राशी संबंधित समता संस्थांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

नाशिकमधील अशोक खरात यांच्या निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांचा मोठा ताफा तैनात असून, घरातील कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांचा कसून तपास केला जात आहे. संशयास्पद आर्थिक व्यवहारांच्या तपासासाठी ही कारवाई केली जात आहे.यामध्ये अशोक खरात यांचा ‘तृप्तबाला’ बंगला आणि समता पथसंस्थेचाही समावेश आहे. अशोक खरात याने समता पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

खराब नाही भोंदूगिरीच्या नावाखाली केलेल्या काळ्या कारनाम्याची मालिका समोर येत असताना खरात यांच्याशी संबंधित असलेल्या या बँकेतही ईडीने छापेमारी केली आहे. बँकेतील व्यवहारांमध्ये काही अनियमितता आढळली आहे का किंवा मनी लाँड्रिंगचा काही प्रकार आहे का? या दृष्टीने तपास यंत्रणा शोध घेत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!