सदानंद कदम यांना 5 दिवसांची ईडी कोठडी…!

मुंबई : अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने १५ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, काल त्यांना ताब्यात घेत चौकशी केल्यानंतर त्यांनी समाधानकारक माहिती न दिल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आले.
दरम्यान ईडीने सादर केलेल्या पुराव्यात अनिल परब यांच्या खात्यातून एक कोटी रुपये विभा साठे यांना दिल्याचे उघड झाले आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार ही रक्कम सदानंद कदम यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. ईडीचा युक्तिवाद कोर्टाने मान्य केला असला तरी सुद्धा १४ दिवसांच्या कोठडीची मागणी फेटाळली आहे.
Views:
[jp_post_view]