बाकरवडी खाताय? सावधान! चितळे बंधूंच्या नावावर पुण्यात बनावट बाकरवडीची विक्री, ‘चितळे स्वीट होम’वर गुन्हा दाखल..


पुणे : चितळे बंधू मिठाईवाले यांच्या नावाचा गैरवापर करून पुण्याची ओळख बनलेल्या बाकरवडीचे उत्पादन करून त्याची ऑनलाइन आणि ऑफलाइन विक्री करून फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकणी फसवणुकीच्या आरोपावरून सदाशिव पेठेतील ‘चितळे स्वीट होम’च्या’ मालकावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नितीन दळवी (वय ३५, रा. धनकवडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. चितळे स्वीट होमचे मालक प्रमोद प्रभाकर चितळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं घडलं काय?

चितळे बंधू मिठाईवाले यांच्याकडे ठरलेल्या काही ग्राहकांकडून बाकरवडीची चव बदलली असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या मुळे तक्रारदारांनी बाजारातील काही पाकिटे विकत घेऊन त्याची पाहणी केली. तेव्हा चितळे बंधू मिठाईवाले यांच्याकडून तयार होणाऱ्या पाकिटात आणि बाजारतील अन्य पाकिटांत तफावत आढळून आली. त्याची चव, पाकिट व तयार होणाऱ्या सर्व गोष्टींची प्रमुख कारखान्यात तपासणी केली.

त्यासोबतच या पाकिटावर मराठीत ‘चितळे स्वीट होम’ तसेच पुणेरी स्पेशल बाकरवडी असेदेखील असल्याचे दिसून आले. तेव्हा तक्रारदारांना त्यांच्या नावाने बाकरवडी विक्री केली जात असल्याचे लक्षात आले. यानंतर या प्रकरणी तक्रार देण्यात आली होती.

चितळे बंधू मिठाईवाले यांचे भागीदार इंद्रनील चितळे यांनी पुणे पोलिसांकडे चितळे स्वीट होमकडून चितळे बंधू मिठाईवाले यांच्या अधिकृत ई-मेल आयडी, ग्राहक क्रमांक नंबर, मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स, संपर्क क्रमांक, छापून त्यांची बाकरवडी ही चितळे बंधू मिठाईवाले यांची बाकरवडी असल्याचे भासवून विक्री केली जात असल्याची तक्रार देण्यात आली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!