Earthquake : मोठी बातमी! चंद्रपूर, गडचिरोलीला भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…


Earthquake : चंद्रपूर आणि लगतच्या गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज बुधवारी सकाळी ७.३० वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत. या धक्क्यामूळे नागरिकात भीतीचे वातावरण दिसत आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू तेलंगणातील मुलुगू या गावात होता.

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असून रिष्टर स्केलवर ५.३ तिव्रतेची नोंद घेण्यात आली आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातही या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.

यासंदर्भात नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन चंद्रपूर चे जिल्हाधिकारी विनय गौडा व गडचिरोली चे जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे आज सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी भूकंप झाला आहे. याचे सौम्य धक्के चंद्रपूर जिल्ह्यात जाणवले आहे.

दरम्यान, या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर ५.३ अशी नोंदविण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा असे आवाहन चंद्रपूर व गडचिरोलीचे जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group