राजकारणात भूकंप! भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांचा मध्यरात्री तडकाफडकी राजीनामा, नेमकं काय घडलं?


पुणे : महापालिकेतील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असतानाच महापौर आणि उपमहापौर पदांवरून सुरू असलेला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.यावरूनच आता भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नाशिक महापालिकेत भाजपचे संख्याबळ प्रबळ असल्याने महापौर आणि उपमहापौर भाजपचेच होणार, हे जवळपास निश्चित होते. या पदांसाठी अनेक दावेदार होते. त्यामध्ये नवे-जुने असे दोन्ही प्रकारचे अनेक नावे निश्चिती होती.मात्र ती डावलून दुसरीच नावे घोषित केल्यामुळे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

दरम्यान महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठीची नावे निश्चित करताना प्रदेश पातळीवरून आलेल्या हस्तक्षेपामुळे स्थानिक नेतृत्वात नाराजी निर्माण झाल्याची माहिती आहे..महापौर पदासाठी भाजपकडून हिमगौरी अडके आणि उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. अखेर नाराज होऊन शहराध्यक्ष सुनील केदार यांनी राजीनामा दिला आहे

याबाबत ते म्हणाले, गेल्या 41 वर्षापासून पक्ष संघटनेत आपण काम करत आहोत.मात्र पक्ष श्रेष्ठींकडून निश्चित हा प्रकार पहिल्यांदाच घडल्याचा दावा केदार यांनी केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!