पार्टी करताना साहेबांचा फोन पडला पाण्यात, मग काय तब्बल २१ लाख लिटर पाणी उपसून केली नासाडी

रायपूर : महागडा फोन धरण क्षेत्रातील पाण्यात पडल्यानं सरकारी अधिकाऱ्यानं धरणातील पाणी पंप लावून उपसलं. जवळपास तीन दिवस धरणातील पाण्याचा उपसा सुरू होता. या दरम्यान तब्बल २१ लाख लिटर पाण्याची नासाडी केल्याप्रकरणी कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

एसडीओच्या निलंबनानंतर अन्न निरीक्षक राजेश बिस्वास, जलसंपदा विभागाचे एसडीओ रामलाल धिवर आणि उपअभियंता छोटेलाल ध्रुव यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
भरदिवसा घरफोडया करणाऱ्या चोरट्यांना लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ४ लाखाचा मुद्देमाल जप्त

मोबाईल वास्तविक, कोयलीबेडा ब्लॉकचे अन्न निरीक्षक राजेश विश्वास हे रविवारी त्यांच्या मित्रांसोबत पंखजूर येथील परळकोट जलाशयाजवळ पार्टी साजरी करण्यासाठी गेले होते. सेल्फी घेताना त्याचा महागडा फोन पाण्यात पडला. त्यावेळी जलाशयात १५ फूट पाणी होतं.
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आधार वैधतेसाठी १५ जूनची मुदत, विद्यार्थी आणि शिक्षकांना मोठा दिलासा
विश्वास यांनी मोबाईल शोधण्यासाठी ग्रामस्थांना कामाला लावलं. पाणबुडे जलाशयात उतरले. मात्र त्यांना मोबाईल शोधण्यात अपयश आलं. त्यानंतर मोबाईल शोधण्यासाठी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. ३० हॉर्सपॉवरचा पंप लावून जलाशयातून पाणी बाहेर काढण्याचं काम सुरू झालं. त्यासाठी सलग चार दिवस पंप सुरू होता.
LPG गॅसच्या दरांत घट, सिलेंडर 83.5 रुपयांनी स्वस्त, महागाईत मोठा दिलासा
नायब तहसीलदार सुनील कुमार ध्रुव यांच्या अहवालावरून पाखंजूर पोलीस ठाण्यात कलम ४३०, ३४ अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी जलसंपदा विभागाचे एसडीओ आर एल धिवार यांनाही निलंबित करण्यात आले होते. अन्न निरीक्षकाचा मोबाईल काढण्यासाठी त्यांनी जलाशय रिकामे करण्याचे तोंडी आदेश दिल्याचा आरोप आहे.
प्रशासनाने दिलेल्या कारणे दाखवा नोटीसला उत्तर देताना एसडीओ यांनी या संपूर्ण प्रकरणापासून काडीमोड घेतला होता. ना त्यांनी पाणी काढण्याची परवानगी दिली, ना जलाशय रिकामे करण्याची माहिती दिली, असे सांगण्यात आले.