क्रिकेट मॅचदरम्यान विराट खातो खास चॉकलेट, एका पॅकची किंमत वाचून थक्क व्हाल…


नवी दिल्ली : भारताचा नामवंत खेळाडू असलेला विराट कोहली केवळ त्याच्या उत्तम खेळीसाठीच नाही तर त्याच्या उत्कृष्ट फिटनेससाठी देखील ओळखला जातो. क्रिकेट सामन्यादरम्यान कोहली अनेकदा चॉकलेट खाताना दिसतो. नेमकं हे चॉकलेट कोणतं आहे, यामागचं रहस्य काय आहे हे आपण पाहणार आहोत.

विराट कोहली जे चॉकलेट खातो ते जेलीच्या स्वरूपात असतं आणि त्यामध्ये कॅफिन व कार्बोहायड्रेट्सचा समावेश असतो. हे चॉकलेट थकवा दूर करण्यासाठी आणि शरीराला तात्काळ ऊर्जा देण्यासाठी उपयोगी ठरतं. विशेष म्हणजे हे चॉकलेट लंडनमधील एका ब्रँडचं असून भारतात सहा पीसच्या एका पॅकची किंमत तब्बल ₹5,000 आहे.

तसेच सामन्यादरम्यान अनेक वेळा कोहलीला थकवा जाणवतो, तेव्हा तो हे चॉकलेट खातो. हे केवळ चवदार नाही तर ऊर्जा पुनर्प्राप्तीमध्ये उपयुक्त असल्यामुळे फिटनेससाठी सजग असलेल्या कोहलीच्या डाएटचा महत्त्वाचा भाग आहे. रिपोर्ट्सनुसार या चॉकलेटचं वजन सुमारे 100 ग्रॅम असून ते ऑनलाइन पोर्टल्सवर उपलब्ध आहे.

दरम्यान, या चॉकलेटची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा झाली आहे. विशेषतः एका IPL सामन्यादरम्यान विराटच्या हातात हे चॉकलेट दिसल्यावर लोकांमध्ये कुतूहल निर्माण झालं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले.

कोहलीचा माजी सहकारी एबी डिव्हिलियर्सने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, विराटला डार्क चॉकलेट विशेष आवडतं. मात्र तो नेहमी एनर्जेटिक आणि पोषक तत्वांनी भरलेलं चॉकलेटच निवडतो, जे शरीरासाठी फायदेशीर ठरतं.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!