RBI च्या निर्णयामुळे बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त कर्ज! कोणत्या बँका? जाणून घ्या…


नवी दिल्ली : देशातील कर्जदारांसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात जाहीर केल्यानंतर अनेक बँकांनी तत्काळ त्यांच्या कर्जव्याजदरात बदल लागू केले आहेत. कर्जदारांना आता होम लोन, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जांवर कमी EMI भरावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. RBI च्या या निर्णयामुळे बाजारात सकारात्मक वातावरण तयार झाले असून बँकिंग क्षेत्रातही व्याजदर कपातीची स्पर्धा सुरु झाली आहे.

RBI ने रेपो रेट 5.50 टक्क्यांवरून कमी करून 5.25 टक्के केला आहे. हा गेल्या काही महिन्यांतील सर्वात महत्त्वाचा आर्थिक निर्णय मानला जात आहे. रेपो रेट कमी झाल्याने बँकांना कमी व्याजदरात निधी उपलब्ध होतो आणि त्याचा थेट फायदा ग्राहकांना मिळतो.

त्यामुळे RLLR शी जोडलेल्या कर्जांच्या EMI मध्ये थेट घट दिसून येते. नवीन कर्ज घेणाऱ्यांना सुरुवातीपासूनच कमी व्याजदराचा लाभ मिळणार आहे, तर जुन्या कर्जदारांना EMI किंवा कर्जाची कालावधी कमी करण्याचा पर्याय मिळेल.

RBI च्या घोषणेनंतर सर्वात वेगाने प्रतिसाद देत बँक ऑफ बडोदाने आपल्या Baroda Repo Linked Lending Rate मध्ये 0.25 टक्क्यांनी कपात केली. नवीन व्याजदर 7.90 टक्के घोषित करण्यात आला असून हा दर 6 डिसेंबर 2025 पासून लागू झाला आहे. हा देशातील सर्वात स्वस्त कर्ज देणाऱ्या बँकांपैकी एक ठरला आहे. दुसरीकडे इंडियन बँकेनेही आपल्या रेपो-लिंक्ड बेंचमार्क रेटमध्ये 0.25 टक्के कपात करत 7.95 टक्के असा नवीन दर जाहीर केला आहे.

       

बँक ऑफ इंडियाने सर्वात आधी व्याजदर कमी केले असून त्यांच्या RBLR मध्ये 25 बेसिस पॉइंट्सची घट करण्यात आली आहे. बँकेचा नवीन दर 8.10 टक्के असेल व तो 5 डिसेंबरपासून लागू आहे. खासगी क्षेत्रातील करूर वैश्य बँकही मागे राहिली नाही. त्यांनी External Benchmark Rate – Repo Linked मध्ये 0.25 टक्क्यांची घट करून 8.55 टक्के नवीन दर जाहीर केला आहे.

व्याजदर कपातीनंतर बँक ऑफ बडोदा सध्या सर्वात कमी म्हणजेच 7.90 टक्के व्याजदराने कर्ज देत आहे. त्यापाठोपाठ इंडियन बँक (7.95%), बँक ऑफ इंडिया (8.10%) आणि करूर वैश्य बँक (8.55%) आहेत. त्यामुळे कर्ज घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी असून पुढील काही दिवसांत आणखी काही बँका व्याजदर घटवण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. रेपो रेटमध्ये कपात झाल्याने संपूर्ण कर्ज बाजारात मोठे बदल दिसून येणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!