दारूच्या नशेत संसाराची राखरांगोळी; नवऱ्याची लाथा बुक्क्यांनी बायकोला मारहाण, डोक्यात भयंकर रक्तस्त्राव…


मुंबई : मुंबईतील वडाळा परिसरात दारूच्या नशेत एका पतीने आपल्या संसाराची राख रांगोळी केली. जोरदार वादातून त्याने पत्नीवर हल्ला करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,कविता महेश वाड असे मृत महिलेचे नावं आहे कविता आणि महेश यांच्यामध्ये वारंवार भांडणे व्हायची.
घटनेच्या त्या दिवशी महेश दारूच्या नशेत असल्याने रागाच्या भरात त्याने कवितावर हल्ला केला, ज्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली.आरोपी महेशने आपल्या पत्नीवर इतका निर्घृणपणे हल्ला केला, तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तसेच वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने तिची प्रकृती खालावली.शेजाऱ्यांनी तिला रुग्णालयात नेले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

शवविच्छेदनातून असे दिसून आले की, कवितावर अत्यंत गंभीर शारीरिक हल्ला झाला होता. तिच्या शरीरावर अनेक काळे-निळे व्रण होते. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!