चालकाची डुलकी भोवली ; मुंबई -पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताचा थरार ; कारने 5 जणांना चिरडलं…


पुणे : ऐन दिवाळीत मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर चालकाच्या डुलकीने भयानक अपघात घडला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भयानक होता की, चालकाला डुलकी लागल्याने त्यांचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला.
या अपघातात एकूण पाच जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईकडे जात असताना मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर चार चाकी गाडीच्या वाहनचालकाला झोप लागल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटलं. यादरम्यान गाडी टोल नाक्यावरील डिव्हाडर येऊन आदळली.पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना कामोठे येथील एमजीएम हॉस्पीटल मध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत.या घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला असुन कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र आर्थिक हानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत. या घटनेनंतर एक्स्प्रेसवेवर लांबचा प्रवास करणाऱ्या चालकांनी पुरेशी विश्रांती घेणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. दरम्यान संबंधित चालकाला शिक्षा होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!