वकिलाचा पेहराव करून भर कोर्टात कुख्यात गुन्हेगारावर पिस्तुलातून गोळ्यांची बरसात…


लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुंडांच्या हत्यांचे सत्र सुरूच आहे. आता हल्लेखोराने गुंड संजीव माहेश्वरी उर्फ जीवा या कुख्यात गुन्हेगार आणि माफिया मुख्तारचा अत्यंत जवळचा गुंड याची हत्या केली. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे.

औरंगजेबाचे उदात्तीकरण हा योगायोग नाही; उदात्तीकरण हे खपवून घेणार नाही देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

हल्लेखोर गोळ्या झाडण्यासाठी दबा धरूनच होता. त्याने वकिलाचा पेहराव केला होता, त्यामुळे याची कोणाला माहिती मिळाली नाही. कोर्टात जीवा कोर्टरूमच्या दिशेने निघाला, तेव्हा आरोपी विजय यादवने त्याच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली.

कोल्हापूर दंगलीबाबत अजित पवार यांचे गंभीर आरोप; म्हणाले, निवडणूका समोर ठेऊन राज्यात..

डोळ्याच्या पापण्या मिटत नाहीत तोच जीवाचा जीव गेला. यामुळे मोठा गोंधळ झाल्याचे बघायला मिळाले. विजय संजीवच्या आधी कोर्टाच्या आवारात पोहोचला होता. कोर्टरूमच्या बाहेर फाईल्स घेऊन बसला.

महापारेषणच्या बिघाडाने लोणीकंद ते कराड वीजवाहिनीत बिघाड; पूर्व हवेली तालुक्यात चक्राकार पध्दतीने भारनियमन

यामुळे त्याच्यावर कोणाचा संशय आला नाही. त्याने कोटमध्ये रिव्हॉल्व्हर लपवून ठेवले होते. गोळीबाराच्या आवाजाने संपूर्ण न्यायालय परिसर दुमदुमून गेला. सर्वत्र चेंगराचेंगरी झाली.

दरम्यान, वकिलांनी धाव घेत हल्लेखोराला पकडून बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमींना ट्रॉमामध्ये दाखल करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!