तरुणाने ड्रीमगर्ल बनून मास्तराला गंडविले ! प्रेमात बुडालेला मास्तर ५ लाखाला गंडला…!
जशपूर : देशात तरूणापासून ते थेट वृद्धांना प्रेम प्रकरणात लुटण्याची टोळी देशात निर्माण झाल्याचे चित्र गेल्या सहा महिन्यापासून सक्रीय झाल्याने या गुन्ह्याची संख्या मोठ्या संख्येने वाढत गेलेली आहे. अशीच एक घटना छत्तीसगडच्या जशपूर येथून फसवणुकीची एक थक्क करणारी बातमी उजेडात आली आहे.
येथे एका तरुणाने मुलीचा आवाज काढून सरकारी शाळेतील एका शिक्षकाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. एक नव्हे तर तब्बल १६ महिन्यांपर्यंत त्याने त्यांच्याशी प्रेमाचे नाटक केले. एवढेच नव्हे तर त्यांच्यापुढे लग्नाचा प्रस्तावही ठेवला.
शिक्षक आपल्या जाळ्यात पूर्णपणे अडकल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने हळू-हळू त्यांच्याकडून सुमारे ५ लाख ६० हजार रुपयांची रक्कम उकळली. पीडित शिक्षकाने सांगितले की, आरोपी तरुणाने माझी मुलगी बनून फसवणूक केली. त्याने मला भेटण्यासाठी बोलावले. मी माझ्या ड्रीम गर्ल अर्थात स्वप्न सुंदरीशी भेटण्यासाठी खूप उताविळ झालो होतो. कारण, मी तिच्यावर आतापर्यंत लाखो रुपयेही उधळले होते.
Views:
[jp_post_view]