Dr. Narendra Dabholkar : मोठी बातमी! तब्बल ११ वर्षांनी दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल, तीन आरोपी निर्दोष, तर दोघांना जन्मठेप…
Dr. Narendra Dabholkar : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल आज जाहीर करण्यात आला. पुणे सत्र न्यायालयाने आज (ता.१०) महत्त्वाचा निर्णय देत तीन आरोपींना निर्दोष, तर दोघांना दोषी ठरवले आहे. तब्बल ११ वर्षांनी प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला.
याप्रकरणी तीन आरोपींना निर्दोष ठरवण्यात आलं असून दोन आरोपींना दोषी ठरवले गेले आहे. या प्रकरणात न्यायालायाने सचिन अंदूरे आणि शरद कळसकर यांना जनमठेप आणि पाच लाख दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर, विरेंद्र तावडे आणि विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर या तिघांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
२० ऑगस्ट २०१३ रोजी मॉर्निंग वॉक करत असताना ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर दाभोलकर यांची दुचाकीवर आलेल्या दोघांनी गोळ्या झाडत हत्या केली होती.
या हत्येनंतर, १५ सप्टेंबर २०२१ रोजी पुण्यातील विशेष न्यायालयात हा खटला सुरु झाला होता. त्यानंतर तब्बल ११ वर्षांनंतर या प्रकरणात न्यायालयाने महत्वाचा निर्णय देत आरोपींना शिक्षा सुनावली आहे. या निकालाकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले होते.