उरुळी कांचन येथील डॉ. अस्मिता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विज्ञान शाखेचा बारावीचा निकाल ९८.५८ टक्के


उरुळी कांचन : येथील अजिंक्य चॅरिटेबल फाऊंडेशन संचलित उरुळी कांचन येथील डॉ. अस्मिता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विज्ञान शाखेचा बारावीचा निकाल ९८.५८ टक्के लागला असून एकूण १४१ पैकी १३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

तसेच सर्वच गुणवंत व यशवंत विद्यार्थीचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, महादेवराव कांचन, सचिव डॉ. अजिंक्य दादा कांचन, संस्थेचे संचालक डॉ. जगदाळेसर, प्राचार्य, रोहिणी जगताप मॅडम, उपप्राचार्य, चव्हाण मॅडम विभागप्रमुख, परभणे सर सर्व स्थाप व पालक यांनी केले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान डॉ. अस्मिता उच्च माध्यमिक व ज्युनियर कॉलेज नव्यानेच सुरु असल्याने एवढे घवघवीत यश संपादन केल्याने उरुळी कांचन व पंचकुशोतुन संस्थेचे व ज्युनियर कॉलेजचे कौतुक केले जात आहे.

कॉलेजमधील पहिले तीन गुणवंत विद्यार्थी

ऐश्वर्या अशोक देवकाते ७७. १७ टक्के

अस्मिता सुनील दोरगे ७५.३३ टक्के

समृद्धी सचिन सातव ७४.१७ टक्के

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!