हुंड्यासाठी छळ, प्रेग्नंट असताना शरीरसंबंधांसाठी त्रास, पुण्यात 29 वर्षीय उच्चशिक्षित विवाहितेने केली आत्महत्या..


पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच आणखी एका महिलेने पुण्यातच हुंड्यासाठी सासरी होणाऱ्या सततच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. यामुळे पुण्यात नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत सध्या तपास सुरु आहे.

याबाबत माहिती आशुने हुंड्यासाठी सासरी होणाऱ्या सततच्या जाचाला कंटाळून उच्चशिक्षित विवाहित तरुणीने आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार पु्ण्यात समोर आला आहे. छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन तिने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. ही घटना हांडेवाडी रस्ता परिसरात घडली. दीपिका प्रमोद जाधव, वय 29 वर्ष, रा. हांडवाडी रस्ता, हडपसर, असे या विवाहित महिलेचे नाव आहे.

तिची सासू द्वारका जाधव हिच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि क्रूर वागणूक देणे या भारतीय न्याय संहितेच्या कलमांच्या अनुसार काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दीपिकाच्या वडिलांनी तक्रार दिली आहे. या प्रकरणी तिच्या सासू विरोधात काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामुळे याबाबत गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. दीपिका आणि प्रमोद यांचे लग्न आठ वर्षांपूर्वी झाले होते. दीपिकाने कृषी पदवीचे शिक्षण घेतले असून, ती एका खासगी कंपनीत नोकरी करीत होती. तिचा पती एका सरकारी कार्यालयात लिपिक पदावर आहे. त्यांना एक मुलगा आहे. यामुळे सुशिक्षित घरात असे प्रकार घडत असतील तर परिस्थिती भयंकर आहे.

याबाबत तक्रारीत सासू व नणंदेकडून पुन्हा मोठे लग्न लावून देण्यासाठी त्रास दिला जात असल्याचेही म्हटले आहे. या प्रकरणी पती, सास व नणंदेविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून याबाबत अनेकांची चौकशी सुरु केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!