भिवंडीत दुहेरी हत्याकांडाचा थरार; भाजप पदाधिकाऱ्यांसह एकाची धारदार शस्त्राने हत्या, मारेकरी फरार…

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात भाजप पदाधिकाऱ्यांसह एकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.रात्री ११ वाजता घडलेल्या या दुहेरी हत्याकांडांने भिवंडीत भीतीच वातावरण पसरल आहे.
प्रफुल्ल तांगडी, तेजस तांगडी अशी हत्या झालेल्या युवकांची नावे आहेत. तर धीरज तांगडी जखमी असून त्याच्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हत्या केलेला मारेकरी फरार असुन पोलिसांकडून शोध सुरू आहे.
याबाबत मिळालेला माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील खारबाव चिंचोटी रस्त्यावरील खार्डी येथे दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. ज्यामध्ये भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी यांचा देखील समावेश आहे. तर दुसऱ्या व्यक्तीचे नाव आहे तेजस तांगडी.
या दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमला पाठवण्यात आला आहे. जखमी धीरज याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. भिवंडी पोलिसांकडून खार्डीमधील घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासण्यात येत आहे. पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे.
दरम्यान याआधी एक वर्षा पूर्वी प्रफुल्ल तांगडी यावर हल्ला झाला होता, त्यानंतर आता पुन्हा हल्ला करण्यात आला. चार ते पाच हल्लेखोरांनी हल्ला करून हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.