ठाकरेंना डबल धक्का; माजी आमदार सपकाळाच्यानंतर निष्ठावंत शिलेदाराचा मशालीला रामराम, राजीनाम्याच कारण काय?


पुणे:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसाठी युती केली आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटाला एका दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत.शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार दगडू सपकाळ यांनी मशालीला रामराम ठोकला आहे. त्यानंतर गोरेगाव येथील निष्ठावंत माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे गोरेगाव येथील निष्ठावंत माजी नगरसेवक दिलीप शिंदे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र मनसे-ठाकरे गट युतीमुळे त्यांना संधी मिळाली नाही. ज्या वॉर्डमधून दिलीप शिंदे निवडून येत होते, तो वॉर्ड यावेळी मनसेला सोडण्यात आला. त्याच गोरेगावमधून दिलीप शिंदे हे आधी चार वेळा निवडून आले आहेत.

आता मतदानाला पाच दिवस उरले असताना ठाकरे गटाच्या दिलीप शिंदे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. या निवडणुकीत संधी न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा रंगू लागली आहे. आता या राजीनाम्यानंतर दिलीप शिंदे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार दगडू सकपाळ यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मी छातीवर दगड ठेवून निर्णय घेतल्याचं दगडू सकपाळ म्हणाले. ठाकरेंच्या या दोन्ही शिलेदारांनी राजीनामा दिल्याने ऐन निवडणुकीत ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!