माझं डोकं चालतय तोपर्यंत काळजी करू नका, खुर्चीत बसून संपवेल!! रामराजे निंबाळकर यांचा थेट इशारा…

फलटण : विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना थेट दिला आहे. आंदरूड (ता. फलटण) येथील कार्यक्रमात रामराजे बोलत होते. त्यांनी अप्रत्यक्षरित्या मंत्री जयकुमार गोरे व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना इशारा दिला आहे.
रामराजे म्हणाले, आता माझं वय ७७ झालं. मी थकलो तर नाहीच, वय वाढले. जुनी दुखणी त्रास देणारच. पण डोकं चालतंय त्याला काय करणार? डोकं जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही काळजी करू नका, खुर्चीत बसून संपवीन, फलटणच्या राजकारणात गावोगावी भांडणं, मारामाऱ्या सुरू होत्या. हे सगळं थांबवण्यासाठी राजकारणात आलो.
भांडणाची संस्कृती थांबवून विकास केला. पाणी आणलं. आता माझं वय ७७ झालं. मी थकलो तर नाहीच, वय वाढले. जुनी दुखणी त्रास देणारच. पण डोकं चालतंय त्याला काय करणार? डोकं जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही काळजी करू नका, खुर्चीत बसून संपवेन, असा इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे आता नव्या राजकीय संघर्षासाठी ललकारले आहे.
यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकारणाला वेगळं वळण लागले आहे. तसेच निवडणुकीवर ते म्हणाले, तुम्ही निवडणुकीची चर्चा कशाला करता? फार काय आक्रित झालं नाही. सत्ता नसताना जे कार्यकर्ते टिकतात तेच खरे कार्यकर्ते असतात. सत्तेचा उपभोग घेणारेच गेले. जाणाऱ्यांचे नावही घेऊ नका.
आता आपणाला आपली दिशा पकडायचीय. आपल्या विरोधात दोन मातब्बर पक्ष होते. मुळातच माझा पिंड अपक्षाचाच आहे. जो आपलं काम करेल तो आपला पक्ष सकाळी १० किंवा ११ वाजता मी कामाला सुरुवात करतो. दिवसातील पहिला दीड तास पोलीस ठाण्याला फोन करायला जातो. सांगा विकास कुठे राहिला? या भानगडीतच दिवस जातो, असेही ते म्हणाले.