आता चूक करू नका! लगेच करा हे काम, अन्यथा थेट रेशन कार्डच रद्द होणार, वाचा फायद्याची माहिती…

पुणे : राज्यात अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे शिधापत्रिकांची पडताळणी मोहीम सुरू करण्यात आलीये. यामध्ये अंत्योदय, केशरी आणि पांढऱ्या शिधापत्रिकांची तपासणी केली जाणार आहे. १ एप्रिल ते ३१ मेपर्यंत ही मोहिम सुरू राहणार आहे.
दरम्यान, या काळात रेशन कार्ड धारकांना रहिवासाचा पुरावा द्यावा लागणार आहे. १५ दिवसांच्या मुदतीत रहिवासाचा पुरावा देऊ न शकणाऱ्या शिधापत्रिका थेट रद्द करण्यात येणार आहेत.
तसेच केंद्र सरकारकडून रेशन धान्याबाबत लाभार्थ्यांचा इष्टांक ठरविला जातो. नव्याने समाविष्ट होणाऱ्या लाभार्थ्यांना या इष्टांकात सामावून घेण्यासाठी राज्य सरकारने अपात्र लाभार्थ्यांची शोध मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार १ एप्रिल ते ३१ मे या काळात संबंध राज्यभर अपात्र लाभार्थी शोधले जाणार आहेत.
राज्य सरकारने रहिवासी पुरावा न देणाऱ्यांची शिधापत्रिका थेट रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी रास्त भाव दुकानदारांकडून अर्ज उपलब्ध करून दिला जाणार आहे. या अर्जासोबत शिधापत्रिकाधारकांना हमीपत्र द्यावे लागणार आहे.
दरम्यान, अर्जासोबतच रहिवासाचा पुरावा द्यावा लागेल. त्यात भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, गॅस जोडणी क्रमांकाची पावती, बँकेचे पासबुक, विजेचे बिल, फोन- मोबाइल बिल, वाहन परवाना, कार्यालयीन तसेच अन्य ओळखपत्र, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड यापैकी एक दाखला द्यावा लागेल.