सावधान! उन्हाळ्यात लहान मुलांना मोबाईल देऊ नका, शिरूरमध्ये मोबाईल गरम होऊन स्फोट झाल्यामुळे…

शिरूर : यावर्षीचा उन्हाळा हा मोठ्या भयंकर आहे. यामध्ये अनेकांचे जीव देखील गेले आहेत. असे असताना मोबाईल देखील यामध्ये गरम होत आहेत. शिरूरमध्ये मोबाईल चा स्फोट होऊन चिमुकल्याला डोळ्याला इजा झाल्याचा प्रकार घडला आहे.

काय सांगता! सेक्सला खेळ म्हणून मान्यता, आता रंगणार सेक्स चॅम्पियनशिप..
यामुळे लहान मुलांना मोबाईल खेळायला देताना काळजी घ्यावी लागणार आहे. साहिल हा मुलगा मोबाईल हाताळत असताना अचानक हातातील मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला. यामुळे मोठा गोंधळ झाला.

यशवंत कारखान्याच्या संचालक मंडळ निवडीसाठी पाच नंबर गटाकडून ५ लाखाचा निधी, अजून निधी गोळा करणार..
मोबाईलचा स्फोट झाल्यावर काही क्षण त्याला काही समजले नाही. स्फोटाच्या आवाजाने घरातील लोकं पळत आले. त्यावेळी साहीलच्या डोळ्याला इजा झाली होती.
भरदिवसा घरफोडया करणाऱ्या चोरट्यांना लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ४ लाखाचा मुद्देमाल जप्त
त्याच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी डोळ्याचे ऑपरेशन करावे लागेल, असे सांगितले गेले. साहिल यास उपचारासाठी तातडीने एच व्ही देसाई हडपसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यानंतर डॉक्टरांनी देखील तात्काळ दखल घेऊन साहिल चे डोळ्याचे वेळेमध्ये ऑपरेशन केले. यासाठी आमदार अशोक पवार यांनी देखील मोठी यंत्रणा हलवून मदत केली.