डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा झटका, ‘त्या’ एक सहीमुळे भारताची धाकधूक वाढली, देशभरात खळबळ…

नवी दिल्ली : अमेरिका आणि भारतामध्ये एक मोठी ट्रेड डील झाली आहे, या ट्रेड डीलमुळे दोन्ही देशांना देखील फायदा होणार आहे. दरम्यान अमेरिका आणि भारतामध्ये ट्रेड डील अंतिम टप्प्यात असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली होती, अमेरिकेनं भारतावरील टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेनं भारतावरील टॅरिफ 50 टक्क्यांवरून कमी करून थेट 18 टक्क्यांवर आणला. आशियातील इतर देशांच्या तुलनेत भारतावर सध्या सर्वात कमी आयात शुल्क आकारले जात असल्याने भारतीय उद्योगांसाठी हा मोठा दिलासा मानला जात होता.
मात्र या निर्णयामुळे मिळालेला आनंद फार काळ टिकण्याची शक्यता नाही. कारण याच दरम्यान अमेरिकेकडून आणखी एक कठोर पाऊल उचलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे व्यापाराच्या आघाडीवर दिलासा मिळाला असला तरी रोजगाराच्या बाबतीत भारतासाठी चिंता निर्माण झाली आहे.

अमेरिकेत काम करण्याची संधी शोधणाऱ्या लाखो भारतीयांसाठी ही परिस्थिती अस्वस्थ करणारी ठरत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळापासूनच H-1B व्हिसा कार्यक्रम त्यांच्या निशाण्यावर राहिला आहे.
काही दिवसांपूर्वीच या व्हिसाच्या शुल्कामध्ये मोठी वाढ करण्यात आली होती. आता मात्र हा कार्यक्रम पूर्णपणे बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या संसदेत या योजनेला संपुष्टात आणण्यासाठी विधेयक सादर करण्यात आले असून, यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.